IND vs SL T20 :  भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या सामन्यात भारताचे युवा मॅचविनर फेल झालेले दिसले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर चालू असलेल्या सामन्यात टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 162/ 5 धावा केल्या. श्रीलंकेकडून  मदुशनाका, तीक्ष्णा, करूणारत्ने, डिसिल्वा आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 41 धावा, इशान किशनने 37 धावा आणि अक्षर पटलने 31 धावा करत संघाला 150 धावांचा पल्ला पार करून दिला. श्रीलंकेला सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागणार आहे. (IND vs SL 1st T20  match India gave Sri Lanka a target of 163 runs latest marathi news) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच षटकात इशान किशनने आक्रमक पवित्रा घेत दोन चौकार एक षटकार मारला. शुभमन गिलनेही चौकार मारत टी-20 मधील पदार्पण केलं. मात्र शुभमन फार काही काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही त्याला तीक्ष्णा 7 धावांवर बाद केलं. सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी साकारता आला नाही, तोही 7 धावा करून माघारी परतला.  


संजू सॅमसनही डिसिल्वाच्या जाळ्यात अडकला आणि 7 धावांवर बाद झाला. कर्णधार पांड्याने डाव सावरला असं वाटत असताना इशान किशन 37 धावांवर बाद झाला. पांड्याही 29 धावांवर असताना आऊट झाला. शेवटी दीपद हुड्डाने शानदार फलंदाजी केली 23 चेंडूत 41 धावा केल्या त्यासोबतच अक्षर पटेलनेही 20 चेंडूत 31 धावा केल्या. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारत 150 धावांचा पल्ला पार करू शकला. श्रीलंकेला 163 धावांचं आव्हान आहे.